Weather forecast: राज्यातील हवामान विभागाकडून पावसाचे इशारे आले आहेत. सध्या या महिन्याच्या अखेरीस पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे अचानक हवामानात बदल झाला आहे काही ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण झाले हे पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. या वातावरणामुळे अचानक थंडी कमी झाली आहे. अरबी समुद्रामध्ये आद्रतेचे प्रमाण वाढल्याने राज्यात काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने ओळखली आहे त्याचबरोबर
भारतामध्ये काही भागात गेल्या काही दिवसापूर्वी तापमानात वाढ झाली होती त्या तापमानात वाढ झाल्यामुळे अरबी समुद्रात आद्रता वाढली त्याचबरोबर हा गारवा कमी झाल्यामुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः, विदर्भात २४ आणि २५ डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच, धुळे, नंदुरबार, जळगाव, आणि नाशिक जिल्ह्यांसाठी २६ डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. खालील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे:
विदर्भ विभाग:
- नागपूर
- अमरावती
- वर्धा
- चंद्रपूर
- गोंदिया
- भंडारा
मराठवाडा विभाग:
- औरंगाबाद
- नांदेड
- परभणी
- लातूर
उत्तर महाराष्ट्र:
- नाशिक
- धुळे
- जळगाव
- नंदुरबार
कोकण विभाग:
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- रायगड
पश्चिम महाराष्ट्र:
- पुणे
- सातारा
- सांगली
पावसाचा प्रकार:
- हलका ते मध्यम पाऊस: बहुतेक जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे.
- वादळी पाऊस: काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे.
- पुराचा धोका: किनारी भागांमध्ये समुद्राची पातळी वाढण्याची शक्यता.
- शेतकऱ्यांनी पीक संरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
- नागरिकांनी प्रवासाच्या वेळी हवामानाचा अंदाज तपासावा.
- आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. Weather forecast